⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

कासोद्यात बनावट स्वाक्षरी करीत सचिवानेच १ लाखात गंडवले!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२२ । बाम्हणे येथील साईदुध उत्पादक संस्थेच्या सचिवाने परस्पर धनादेशावर बनावट सह्या करून दुध डेअरीच्या मालकाची १ लाख ८ हजार रूपयांची फसवणूक केली. याबाबत कासोदा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंदा रामदास पाटील ( वय ६२ ) रा. बाम्हणे यांचे गावात साई दुध उत्पादक सोसायटी आहे. त्या दुकानावर कैलास सदाशिव पाटील ( रा. बाम्हणे ) हा सचिव पदावर आहे. २६ जून रोजी गोवींदा पाटील यांच्या नावे असलेल्या धनादेशवर बनावट स्वाक्षरी करून १ लाख ८ हजार ४८२ रूपये परस्पर काढून घेतले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर गोविंदा पाटील यांनी कासोदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून कासोदा पोलीस ठाण्यात कैलास पाटील याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ समाधान सिंहले करीत आहेत.