जी.एच.रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमानिमित्ताने वृक्षारोपण
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । वृक्ष लागवडीचा संकल्प करूया, वृक्षाचं संवर्धन करूया अशी शपथ घेत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील विध्यार्थ्यानी विविध प्रकारच्या वनस्पतीचे वृक्षारोपण केले. या कार्यक्रमात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदविला.
गुरुपौर्णिमा दिनानिमित्त गुरू-शिष्यांच्या जोड्यांचा कथाकथनाचा कार्यक्रम यावेळी पार पडला. तसेच पर्यावरण, निसर्ग, पशू-पक्षी, पुस्तके, इंटरनेट, संगणक, शाळा, शिक्षक अशा सर्व सजीव, निर्जीव गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करू, अशी ग्वाही विध्यार्थ्यानी यावेळी दिली. यानंतर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची शपथ विध्यार्थांकडून घेण्यात आली. यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी मनोगत व्यक्त करत, जीवनातील गुरुचे महत्व अधोरेखित करत, गुरु – शिष्याची चालत आलेली परंपरा यावर विचार मांडले, तसेच वृक्षसंवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे सांगत विध्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी आरती पाटील, अल्फिया लहरी, प्राजक्ता पाटील विजया लोंढे, ममता शरण, अश्विनी घोगले, निधी खडके, मीना पाटील, संजय चव्हाण,सोनिया शर्मा, अमन पांडे, शुभांगी बडगुजर, तुषार कुमावत यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.