जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती काही गेल्या कमी होत नाहीये. आज देखील जिल्ह्यात १ हजार १४२ नवीन रुग्ण आढळून आले असून १ हजार १३४ रुग्णांनी कोरोनावर मत केली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरुच आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून रोजच्या मृत्युंचे आकडे वाढतच आहे. बुधवारी २२ बळींची भर पडून एकूण बळींचा आकडा १९९८ वर पोचला. नव्या ११४२ रु्ग्णांसह एकूण रुग्णसंख्या १ लाख १२ हजार ६७० झाली, तर ११३४ रुग्ण दिवसभरात बरे होऊन घरी गेले. बरे होणाऱ्यांचा आकडाही ९९ हजार ५५४ वर पोचला आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात ११ हजार ११८ रुग्ण विविध रुग्णांमध्ये उपचार घेत आहे.
जळगाव शहराला दिलासा
जळगाव शहरात आज १८९ रुग्ण आढळून आले तर दिवसभरात २०८ रुग्ण बरे झाले. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णसंख्या घटून २२५४ झाली आहे. मात्र, शहरात आज तब्बल ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर- १८९, जळगाव ग्रामीण-३९, भुसावळ- ११४, अमळनेर- ३५, चोपडा- १०५, पाचोरा- ६६, भडगाव- ००, धरणगाव- १८, यावल- २७, एरंडोल- ६५, जामनेर- २८७, रावेर १०४, पारोळा – ३३, चाळीसगाव- १८, मुक्ताईनगर- ३९, बोदवड- ०१ आणि इतर जिल्ह्यातील ०५ असे एकुण १ हजार १४२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.