जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । अमळनेर तालुक्यातील फापोरे येथील १८ वर्षीय तरुणाचा शेतात काम करताना, विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता ही दुर्दैवी घटना घडली. अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूचीकरण्यात आली आहे.
राहुल हिलाल मोरे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा युवक कन्हेरे येथील रतिलाल लोटन पाटील यांच्या शेतात कपाशीला खत लावण्याचे काम करत होता. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खत लावताना, शेतात लोंबकळलेल्या वीजतारेला त्याचा स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. सहकारी मजुरांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले.
तीन बहिणींचा एकच भाऊ
मृत राहुल हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. तो बी.ए.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. वडिलांची परिस्थिती हालाखीची असल्याने राहुल मजुरी करून कुटूंबाला आर्थिक हातभार लावत होता. त्याच्या दोन बहिणी विवाहित आहेत. तर आई, वडील व एका बहिणीसोबत तो राहत होता.