गुन्हेमहाराष्ट्र

धक्कादायक : माजी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या, कारण ऐकून व्हाल थक्क

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । Priyanka Umargekar suiside पुणे जिल्हातील आळंदी नगरपरिषदेच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि आत्महत्या घरगुती कारणाहून झाली होती असे म्हटले गेले. मात्र या आत्महत्येमागचे खरे कारण समोर आले आहे. हुंड्यात ठरलेल्या वस्तू दिल्या नाहीत म्हणून प्रियांका उमरगेकर यांचा छळ केला जात होता. याला कंटाळून तिने आत्महत्या केली असे समोर आले आहे. (Priyanka Umargekar suiside )

या प्रकरणी आळंदी पोलिसांनी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे , त्यांचे पती अशोक उमरगेकर आणि मुलगा अभिषेक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आत्महत्या केलेल्या प्रियांका घोलप या पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांची ती कन्या होती.

प्रियांका आणि अभिषेक यांचा नुकताच ९ महिन्यांपूर्वी विवाह झाला. हा लग्नसोहळा दिमाखात पार पडला. दोन्ही कुटुंब राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने या विवाह सोहळ्याला अनेक राजकारणातील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली.

लग्नानंतर सासरच्यांकडून छळ, अपमानास्पद वागणूक देण्यात येत होती. या सगळ्या त्रासाला कंटाळून प्रियांका यांनी आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. यानुसार पोलिसांनी तपास करून सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. प्रियांका उमरगेकर यांनी मरकळ रोड येथे असलेल्या आपल्या राहत्या घरात रविवारी सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Related Articles

Back to top button