शिवाजीनगरातील विठूरायाच्या मंदिरात साबूदाणा खिचडी वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । आज आषाढी एकादशी निमित्ताने शिवाजी नगरातील विठ्ठल मंदिरात सकाळी शिवाजीनगरातील मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी नागरिकांनी साबूदाणा खिचडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंदिरात येणाऱ्या भाविकांनी व भक्तांनी बालगोपालांनी प्रसादाचा आनंद घेतला.
वारकरी संप्रदायाचा असलेला एक आनंद सोहळा ज्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण या सोहळ्यात सहभागी होत असतात. टाळ-मृदंग च्या तालावर विठ्ठलाचा जय जयकार करत पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी जात. यावर्षीही वारकऱ्यांना पायी यात्रा पंढरपूर कडे जाण्यास बंदी नसली तरी वारकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी पंढरपूर मंदिर पांडुरंगाचे विठ्ठलाचे रुक्मिणी चे दर्शन घेतात.
याप्रसंगी अंकुश कोळी, हिरामण तरटे ,दिलीप नाझरकर, संदीप ठाकूर ,बबन अनपट, भगवान सोनवणे, विनायक पाटील, निशांत पाटील, तुषार सुर्यवंशी, योगेश कद, महेश चौधरी , निशांत काटकर, जयेश इंगोले, रविंद्र पाटील, नरेन शिंदे, मिलिंद बडगुजर, सागर बडगुजर, विकी वरे, सुनील महांगडे , मुकेश सणस आदीसह सुद्धा सहकार्य केले बाकी मित्र मंडळी उपस्थित होते.