सोशल मिडीयाच्या माध्यमातून आ. एकनाथराव खडसेंची बदनामी, एकाविरोधात गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह व पक्षाची सोशल मिडीयावर बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एकाविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोशल मिडीयावर बदनामी
आमदार एकनाथराव खडसे यांची व पक्षाची आणि परीवाराची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शिवमुद्रा या व्हॉट्सअॅप ग्रुपवरत मृत्युंजय नामक व्यक्तीने नाथाभाऊंवर अगदी गलिच्छ व खोटे आरोप करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक यांनी दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीविरोधात पोलिस प्रशासनाला निवेदन देवून दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक, राहुल चौधरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका संघटक, विनोद कोल्हे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष शाकीर शेख, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष वसीम जनाब, युवा नेता मुद्दसर जनाब, प्रकाश पारधे, सामाजिक न्याय विभाग जिल्हा जळगावचे राष्ट्रवादी आदिवासी सेलचे तालुका उपाध्यक्ष सरदार तडवी व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.