वाळू माफियांची तहसीलदारांना दमदाटी करीत वाळूचे ट्रॅक्टर लांबवले
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । मुक्ताईनगर येथील अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडल्यानंतर ट्रॅक्टर मालकाने तहसीलदारांना दमदाटी केली तर चालकाने डुब्लीकेट चावीने ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना तलाठी कार्यालयाजवळील बीएसएनएल कार्यालयाजवळ रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या वाळू होत असताना तहसीलदार श्वेता संचेती यांनी ट्रॅक्टर अडवल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने जागेवरच ट्रॉली खाली केली तर ट्रॅक्टर मालकाने शासकीय कामात अडथळा आणून दमदाटी केली व चालकाने अन्य चावीने ट्रॅक्टर सुरू करून घटनास्थळावरून पळवून नेले. या प्रकरणी तहसीलदारांच्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर चालक सुभाष भोई (मुक्ताईनगर) व सुभाष भोई यांच्या ट्रॅक्टरवरील चालक (नाव, गाव माहित नाही) यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात बुधवारी रात्री उशिरा प्रर्यन्त गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक प्रविण तडवी करीत आहेत.