⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेल महागणार? जाणून घ्या आजचे दर

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेल महागणार? जाणून घ्या आजचे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । सरकारी तेल कंपन्यांनी आज (2 जुलै) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. गेल्या 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. दरम्यान, सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ केली आहे. याचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवर 12 रुपये प्रति लिटरने वाढ केली आहे. याशिवाय एटीएफ निर्यातीवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लिटर 6 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, याचा परिणाम घरगुती पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर होणार नाही.

आज शनिवारी जाहीर झालेल्या नवीन दरानुसार जळगावात पेट्रोल ११२. १९ रु. प्रति लिटर तर डिझेल ९७.३४ रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 इतका आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.78 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 रुपये इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.