यावल

यावल अभयारण्यातील अनधिकृत झोपड्या हटविल्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । यावल अभयारण्यातील जामण्या वन क्षेत्रातील अनधिकृत झोपड्या हटवण्यात आल्या असून वन जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये लंगडा, आंबा परिमंडळ आणि करंजपाणी मधील तब्बल ७७ झोपड्या हटवण्यात आल्या आहेत.

येथील अभयारण्य सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकार पाल अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईतून १६६ अनधिकृत अधिक्रमणधारकांचे २६४.३६ हेक्टर वन जमीनीवरील अतिक्रमण निष्काशन करून नियमानुसार वन जमीन ताब्यात घेण्यात आली.

यावेळी पोलीस महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. जळगाव पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, यावल पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांनी मनुष्यबळ आणि संरक्षण उपलब्ध करून दिले. या कारवाईच्या वेळी यावल अभयारण्य यावल वन विभागमधील वनपाल वनरक्षक तसेच राज्य राखीव दलाचे जवान उपस्थित होते.

Related Articles

Back to top button