जळगाव शहर

पोलिस प्रशासनातर्फे तक्रार निवारणासाठी उद्या जनता दरबार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । जळगाव शहरातील विविध प्रकारच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे उद्या एक दिवसीय जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेे आहे.

नागरिकांना सहजपणे आपल्या तक्रारी पोलिसांकडे मांडून याचे निवारण करता यावे या हेतूने जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. याच अनुषंगाने आता जळगावात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत रामानंदनगर, जिल्हापेठ, शनिपेठ, एमआयडीसी, तालुका व शहर अशा सहा पोलिस स्टेशनच्या ठिकाणी पोलीस ठाणे हद्दीत राहणार्‍या नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी शनिवारी सकाळी १० ते १२ या वेळेत पोलिस मल्टिपर्पज हॉल येथे तक्रार निवारण दिन आयोजीत करण्यात येणार आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button