जळगाव जिल्हा

शिंदे समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांचा नशिराबादेत जल्लोष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. मात्र, काल गुरुवारी राज्यात हिंदुत्व युतीचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेचे बंडखाेर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नशिराबादेत गुरुवारी रात्री ७.३० वाजता जल्लाेष करण्यात आला.

महाराष्ट्रात पुन्हा प्रगतशील, भ्रष्टाचार मुक्त सरकार पुन्हा एकदा हिंदुत्व युतीचे सरकार स्थापन झाले असल्याने भाजपा नशिराबाद शहर व शिवसेना नशिराबाद शहर तर्फे शिवसेना कार्यालय येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद्र पाटील, भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष प्रदीप बोठरे, शिवसेना अध्यक्ष विकास धनगर, युवासेना अध्यक्ष चेतन बराटे यांच्या उपस्थितीत फटाके फोडून जल्लोष करत विजयोत्सव साजरा करण्यात आला.

या विजयोत्सव प्रसंगी चंदू भोळे, कैलास नेरकर, डॉ. विश्वनाथ महाजन, चंदू पाटील, भूषण पाटील, योगेश कोलते, गोपाळ माळी, सचिन महाजन, राजेंद्र पाचपाडे, ललित बाराटे. दीपक घासणे. मुरारी देशपांडे. कीर्ती कांत. चोबे कावळे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

Related Articles

Back to top button