महागड्या पेट्रोलचे टेन्शन सोडा ! ‘या’ दुचाकी गाड्यांना मिळेल 110KM पर्यंत मायलेज
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. मात्र अशातच जास्त मायलेज देणाऱ्या वाहनाकडे पहिले जात आहे. त्यामुळे त्यांचा वाहन चालवण्याचा खर्च कमी होईल. म्हणूनच, जर तुम्ही स्वस्त आणि उत्तम मायलेज देणारी मोटारसायकल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही मोटरसायकलबद्दल माहिती देत आहोत. खरं तर, आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारपेठेत उपस्थित असलेल्या अशा काही बाइक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 65 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, परंतु त्यांचे मायलेज 100 किमी प्रति लीटरपर्यंत असू शकते.
TVS स्पोर्ट
VS स्पोर्टची एक्स-शोरूम किंमत 60 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 66 हजार रुपयांपर्यंत जाते. ही TVS च्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींपैकी एक आहे. त्याचा देखभालीचा खर्चही कमी आहे. या बाइकमध्ये 109cc इंजिन उपलब्ध आहे, जे 8.18bhp जास्तीत जास्त पॉवर जनरेट करू शकते. TVS च्या वेबसाईटवर सूचीबद्ध केलेल्या काही रिव्ह्यूमध्ये असे म्हटले आहे की ही बाईक 110 किमी पर्यंत मायलेज देऊ शकते.
Hero HF DELUXE
Hero MotoCorp च्या Hero HF DELUXE ची एक्स-शोरूम किंमत 56,070 रुपयांपासून सुरू होते आणि 63,790 रुपयांपर्यंत जाते. यात 97.2cc इंजिन आहे, जे 5.9kw पॉवर आणि 8.5Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या वेबसाईटवर एका ग्राहकाचा हवाला देत हे बाईक 100 किमी पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते असे लिहिले आहे.
बजाज प्लॅटिना 100
बजाज प्लॅटिना 100 ची किंमत 61 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 102 cc 4 स्ट्रोक, DTS-i, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 5.8 kW कमाल पॉवर आणि 8.3 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 4-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. त्याचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. ही बाईक 70KM पेक्षा जास्त मायलेज देते.
बजाज CT110X
Bajaj CT110X ची किंमत रु.65 हजार (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. यात 115.45cc 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ८.६ पीएस कमाल पॉवर आणि ९.८१ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात 4-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. ही बाईक 70 किमी पेक्षा जास्त मायलेज देखील देते.