जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । पाचोराच्या पुनगाव येथील शक्तिधाम कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली, शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पाचोरा पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
पंकज प्रमोद पाटील (वय ३०) यांनी पोलिसांत तक्रार दिली. शहरातील शक्तिधाम कॉलनीत पाटील हे वास्तव्यास आहे. दि. २७ रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास कुणी तरी अज्ञात इसमाने त्यांच्या घरातील मागील बाजूच्या बेडरुमध्ये प्रवेश केला. व बेडरूम मधून १ लाख ८१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ४८ हजार रोकड असा एकूण २ लाख २९ हजरांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी पंकज प्रमोद पाटील यांनी दि. २७ रोजी पाचोरा पोलिसांत तक्रार दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक किसनर, लक्ष्मण नजन पाटील यांनी भेट दिली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध भा. कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास राहुल मोरे करत आहे.