जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । बोदवडच्या नांदगाव येथे ११ वर्षीय मंजली विनोद पारधी या बालिकेचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे सर्पदंश झाल्यावर मुलीने ही माहिती वडिलांना दिली. मात्र, मुलगी लहान असल्याने त्यांनी तिचे म्हणने गांभीर्याने घेतले नाही. परिणामी सकाळी ती अंथरुणात मृतावस्थेत आढळली.
ही घटना २६च्या रात्री १२.४० वाजेपूर्वी राहत्या घरात घडली. दरम्यान, सर्पदंश झाल्यानंतर मंजलीने वडिलांना माहिती दिली. मात्र, त्यांनी ही बाब लक्षात आली नाही. मात्र, सकाळी उठताच क्षणी साप घरात दिसल्याने त्यांना घटनेचे गांभीर्य कळाले. मात्र, तोपर्यंत अंथरुणात झोपलेल्या मंजलीला मृत्यूने गाठले होते. तत्पूर्वी, सकाळी कुटुंबीयांनी मंजलीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला.
पण, प्रतिसाद नसल्याने त्यांनी मंजलीला बोदवड ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती ती मृत झाल्याचे घोषित केले. मंजलीचा भाऊ नीलेश कडू पारधी यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास हवालदार सचिन चौधरी करत आहेत.