जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली असून युवकास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एरंडोल तालुक्यातील भातखेडे येथील संशयीत रहिवासी चेतन गोविंदा पाटील (वय २२) या युवकास तालुक्यातील पद्मालय मंदिराच्या रस्त्या जवळ असलेल्या पडक्या बस स्टॉप जवळ दि. २५ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास बेकायदेशीर रित्या २ गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी शस्त्र अधिनियम १९५९ या कायद्या अंतर्गत संशयितावर कार्यवाही करत अटक केली.
त्यांनतर, संशयी आरोपीस दि. २६ रोजी एरंडोल न्यायालयात हजर केले असता, मे. न्यायालयाने आरोपीस २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान सरकार पक्षा तर्फे ॲड. डी बी वळवी तर आरोपीता तर्फे ॲड. अजिंक्य ए काळे व ॲड. आकाश एन. महाजन हे कामकाज पहात आहेत.