दोन गावठी पिस्तूलासह तरूणाला अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । एरंडोल तालुक्यातील भातखेडा गावात हातात दोन गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून दोन गावठी बनावटीची पिस्तुले जप्त केली आहेत. .
एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील राहणारा चेतन गोविंदा पाटील (भदाणे) (वय-20) हा दोन गावठी बनावटीचे पिस्तूल हातात घेवून गावात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, अशरफ शेख, सुनील दामोदरे, दीपक पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, राहुल बैसाने, अशोक पाटील, ईश्वर पाटील यांचे पथक रविवारी २६ जून रोजी दुपारी रवाना केले. पथकाने संशयित आरोपी चेतन गोविंदा पाटील याला अटक केली असून त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे दोन गावठी बनावटीचे पिस्तूल हस्तगत केले आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.