जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । महाराष्ट्र्रातील कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढण्यात आलेली नाही असे ट्विट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. यावेळी यांनी ट्विट केले कि, कोणत्याही बंडखोर आमदार आणि मंत्र्यांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदें यांच्याकडून जाणीवपूर्वक चुकीचे माहिती पसरवली जात आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदारांनी बंद पुकारले आहे. यामुळे महाविकास आघाडीने बंडखोर आमदारांसह त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण काढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर एकनाथ शिंदे यांनी एक पत्र ट्विट केलं होते.
राजकीय आकसाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी बंडखोर आमदारांची सुरक्षा काढली असा आरोप एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे केला होता. परंतु गृहखात्याने एकनाथ शिंदे यांचे आरोप फेटाळले आहेत. गृह विभागाने याबाबत ट्वीट करुन माहिती दिली. “राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले,” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काय म्हंटल आहे पत्रात?
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आमदारांच्या कुटुंबीयांना काही झालं तर मुख्यमंत्री, शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत जबाबदार असतील असंही त्यांनी म्हटलं आहे.