जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून सुमारे ४७ आमदारांसह बंड पुकारला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून विविध ठिकाणी निषेध केला जात आहे. यामुळे जिल्ह्यात देखील संतापाची लाट उसळली असून काल जळगाव, धरणगाव येथे शिवसेना, युवासेनेच्यावतीने निषेध करण्यात आला होता. तर आज भडगावात निषेध करण्यात आला. दरम्यान, बंडखोर आमदारांनी पुन्हा शिवसेनेत परत यावे; अशी मागणी करत आम्ही उध्दव ठाकरे सोबतच असल्याचे सांगितले.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून आसामच्या गुवाहाटी येथील हॉटेलात थांबले आहेत. शिंदे यांच्या बंडाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घालत परत या असे आवाहन केले. मात्र शिंदेनी भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे शिंदे गटाने शिवसेनेशी गद्दारी केली असल्याचे शिवसैनिकांना वाटत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे गटा विरोधात शिवसैनिक निदर्शने करत आहे. तसेच आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगत आहेत.
याचा निषेदार्थ आज भडगावात देखील शिवसेना, युवासेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शासकीय विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर चौकात शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच शिवसैनिकांनी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही लढत रहा तसेच एकनाथ शिंदे यांना देखील पत्र लिहत त्यांना देखील बंडखोरी आमदारांना घेऊन महाराष्ट्रात परत यावे; अशा आशयाचे पत्र भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी लिहिले आहे