⁠ 
रविवार, मे 19, 2024

Eknath Shinde In Guwahati : शिंदे गटाच्या प्रवास आणि हॉटेल खर्चाची आकडेवारी आली समोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । राज्यातील शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या आसाममध्ये मुक्कामी आहेत. गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेल ते थांबले असून त्याठिकाणी 70 खोल्या बूक करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या हॉटेलमध्ये राहण्यासाठी व खाण्यापिण्यासाठी बंडखोर आमदारांवर किती पैसा खर्च झाला याची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांसाठी एकूण 70 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या खोल्या एकूण सात दिवसांसाठी बुक केल्या आहेत. या बुकिंगसाठी एकूण 56 लाख रुपये खर्च झाले आहेत. याशिवाय जेवण आणि इतर सेवांवर दररोज 8 लाख रुपये खर्च होत आहेत. सात दिवसांच्या हिशोबाने हे देखील 56 लाखांवर गेले. अशाप्रकारे बुकिंग आणि खाण्यापिण्याचा मिळून 1.12 कोटी रुपये खर्च येतो. हॉटेलमध्ये आमदार, खासदार व त्यांचे कुटुंबीयही सहभागी आहेत. मात्र, इतका मोठा खर्च कोण उचलत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विमान उड्डाणासाठी लाखोंचा खर्च

मीलिंद खांडेकर यांनी एक ट्वीट केलंय. त्यानुसार, सूरत ते गुवाहाटीला व्यवसायिक प्लाईट नाही. आतापर्यंत एक बोईंग आणि दोन लहान विमान शिवसेनेच्या आमदारांसाठी उडालेत. मोठ्या विमानाचा खर्च सुमारे 40 लाख रुपये आहे. लहान विमानांचा खर्च सुमारे 17 लाख रुपये आहे. हा सर्व खर्च कोण करतोय, असं त्यांनी ट्वीट केलंय.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 आमदार व इतर अपक्ष मिळून एकूण 46 आमदारांचं त्यांना समर्थन आहे. दोन अपक्ष सहभागी झालेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांचा गट मजबूत झाला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोरांवर कारवाईचा इशारा दिला.