⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज ! तब्बल अडीच वर्षानंतर जनरल तिकिटावर प्रवास करता येणार

रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज ! तब्बल अडीच वर्षानंतर जनरल तिकिटावर प्रवास करता येणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे जनरल तिकीट घेऊन मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. 29 जूनपासून मध्य रेल्वेच्या 165 गाड्यांमध्ये जनरल तिकिटांची सुविधा सुरू होणार आहे. तब्बल दोन वर्ष ही सुविधा बंद होती. मात्र, आता प्रवाशांना जनरल तिकिटावर प्रवास करता येणार आहे.

यापूर्वी फक्त ठराविक रेल्वेचं जनरल म्हणजे रिझर्व्हेशन शिवाय मिळत होतं. पण आता रेल्वेच्या एटीव्हीएम, जीटीबीएस, अनारक्षित तिकीट काऊंटर व यूटीएस मोबाईल ॲपद्वारे हे जनरलचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आता वेटिंग लिस्ट असलेल्या आणि ऐनवेळी प्रवासाचं नियोजन करणाऱ्या प्रवाशांनासाठी हा मोठा दिलासा आहे. त्यांचा प्रवास आता सोपा होणार आहे.

जनरल तिकीट मिळणार
आता सर्व मेल एक्सप्रेस रेल्वेगाड्यांमध्ये जनरल तिकिट मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही रिझर्वेशन शिवाय ऐनवेळी तिकीट काढूनही प्रवास करू शकणार आहात. हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा आहे. येत्या 29 जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे.

कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेगाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी जनरल तिकीट बंद करण्यात आलं होतं. आरक्षित तिकीट असलेल्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 1 मार्च 2022 पासून रेल्वेच्या काही विशिष्ट ट्रेनमध्ये जनरल तिकीट सुरू करण्यात आलं. मात्र ते ठराविक रेल्वेंसाठीच मिळत होतं. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. आता मध्य रेल्वेने निर्णय घेत यात बदल केला आता सर्व मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट रेल्वेगाड्यांमध्ये जनरल तिकिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या सर्व मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचे जनरल तिकीट आता सर्वत्र मिळणार आहे. यापूर्वी फक्त ठराविक रेल्वेचं जनरल म्हणजे रिझर्व्हेशन शिवाय मिळत होतं. पण आता रेल्वेच्या एटीव्हीएम, जीटीबीएस, अनारक्षित तिकीट काऊंटर व यूटीएस मोबाईल ॲपद्वारे हे जनरलचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आता वेटिंग लिस्ट असलेल्या आणि ऐनवेळी प्रवासाचं नियोजन करणाऱ्या प्रवाशांनासाठी हा मोठा दिलासा आहे. त्यांचा प्रवास आता सोपा होणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.