भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे यांचे आज पिंपरीत अभिवादन
जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । मुक्ताईनगर प्रख्यात येथील भीमशाहिर प्रतापसिंग बोदडे हे नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले यांना अभिवादन करण्यासाठी आज पिंपरीत दिवसभर प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रख्यात आंबेडकरी कलावंत प्रतापसिंग बोदडे यांचे अलिकडेच निधन झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी पिंपरी चिंचवड येथील प्रतापसिंगदादा बोदडे अभिवादन समितीतर्फे राज्यस्तरीय अभिवादन सभा व संवाद सत्र आज पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजीत करण्यात आले आहे.
या अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रबोधनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात विदर्भातील ज्येष्ठ गायक डी. आर. इंगळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मिलींद बागूल, ववक्ते प्रा. डॉ. सत्यजीत कोसंबी हे संवाद साधणार आहेत. राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील कवी, गायक, कलावंत, कार्यकर्ते, अनुयायी, भीमशाहीर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.