⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | लोकसहभागच ग्रामविकासाचा यशस्वी राजमार्ग – खा उन्मेश पाटील

लोकसहभागच ग्रामविकासाचा यशस्वी राजमार्ग – खा उन्मेश पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । लोकसहभागातून गावाचा विकास करण्यासाठी गावातील सांघिक भावना परस्परांबद्दल असलेला आदरभाव यातूनच शासकीय योजनांचे लाभ आपल्या गावाला मिळताना अडचणी येत नाही. “गाव करी ते राव काय करील” या म्हणीप्रमाणे येत्या काळात गिरणा पूनरुज्जिवन अभियानातील गिरणा वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण दाखविलेला उत्साह असाच कायम ठेवा. आज ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी महाश्रमदान करुन “गिरणा वॉटर कप” स्पर्धेतील लोकसहभागासाठी जो उत्साह दाखवला त्याचे मनापासून अभिनंदन करतो. याला त्याला दोष देण्यापेक्षा आपला परिसर पाणीदार करावयाचा असेल तर लोकसहभाग असाच सूरू ठेवा. शेवटी लोकसहभागच ग्रामविकासाचा यशस्वी राजमार्ग असल्याचे परखड प्रतिपादन खासदार उन्मेश पाटील यांनी आज शिदवाडी ता. चाळीसगाव येथे आयोजित महाश्रमदान कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत “गिरणा वॉटर कप” स्पर्धेला सुरुवात झाली असून गिरणा काठाच्या गावांसह परिसरातील गावांनी गिरणा वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेत महा श्रमदानाच्या माध्यमातून स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. आज सकाळी सात वाजता शिदवाडी येथे महाश्रमदान कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाला राज्याच्या कृषि मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार, बांबू लागवडीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेले बांबू मॅन पाशाजी पटेल, जेष्ठ पत्रकार सरपंच संघटनेचे किसनराव जोर्वेकर, जि.प. सदस्य भाऊसाहेब जाधव, माजी सभापती पं.स.सदस्य संजय तात्या पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पंस. सदस्य पियुष साळुंखे, बाजार समिती संचालक ऍड. राजेंद्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण, सरपंच सीताबाई मोरे, उपसरपंच घनश्याम पाटील, जलसमितीचे अध्यक्ष चंद्रसिंग पाटील, शैलेश पाटील, सुनील पाटील, सरपंच जगदीश पाटील, माजी सरपंच यशवंत पाटील, पोहरे सरपंच काकासाहेब माळी, पोहरे उपसरपंच पंजाबराव अहिरराव, भऊर सरपंच चंद्रभान गायकवाड, मेहुणबारे उपसरपंच ऋषिकेश अमृतकार, दस्केबर्डी सरपंच गणेश आहिरे, जामदा माजी सरपंच रवीआबा पाटील, चेतन वाघ, राहुल पाटील, बारा बलुतेदार संघटनेचे मुकेश गोसावी, सामाजिक कार्यकर्ते किशोर गुंजाळ, रायबा जाधव, राजू पगार,आसिफ सर ,सचिन निकम सर, सुनील पवार उज्वला अहिरराव, ब्रिजेसिंह गुरुजी, एकनाथ कोठावदे, भरतसिंग पाटील, दौलत अहिरराव, पांडुरंग अहिरराव, सूर्यकांत पाटील, युवराज पाटील, विजय पाटील, देवेंद्र राजपूत, ऋषिकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत खासदार उन्मेशदादा पाटील यांनी चारशे किलोमीटर पायी फिरून गिरणा वॉटर कप स्पर्धा आपल्या गिरणा काठाच्या विकासासाठी सूरु केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातुन आपले गाव पाणीदार करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर महिला भगिनींनी सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. येत्या काळात आपल्या परिसरात शेकडो एकर जमिनीवर बांबू लागवडीची कास धरा. बांबू चोवीस तास ऑक्सिजन देणारा तसेच एकरी दोन लाख रुपये उत्पन्न देणारे  असल्याने बांबू लागवडीची कास धरा. असे प्रतिपादन माजी आमदार बांबू मॅन पाशा पटेल यांनी व्यक्त केले. खासदार उन्मेश दादा पाटील, बांबू मॅन पाशा पटेल यांचेसह मान्यवरांनी  श्रमदान करून गावकऱ्यांचा उत्साह वाढवला. गावकऱ्यांची सांघिक भावना पाहून मान्यवरांनी आपल्या मनोगतात शिदवाडी ग्रामस्थांचे कौतुक केले.

 —

author avatar
टीम जळगाव लाईव्ह