⁠ 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | Jalgaon Live News Impact : एसपींच्या बंगल्या शेजारील भिंतीवर लिहिलेली ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट हटवली

Jalgaon Live News Impact : एसपींच्या बंगल्या शेजारील भिंतीवर लिहिलेली ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट हटवली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । जळगाव शहरातील मुख्य गजबजलेला चौक म्हणजे काव्य रत्नावली चौक. याच चौकालगत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांचे निवासस्थान ‘अभय’ आहे. पोलीस अधिक्षकांच्या बंगल्याला लागूनच काव्यरत्नावली चौकाकडून मेहरूणकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या भिंतीवर काही टारगटांनी व्यवस्थेचा निषेध करणारी ‘Fuck The System’ अशी पोस्ट लिहिली होती. जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत वृत्त प्रकाशित करताच जिल्हा पोलीस प्रशासनाने ती पोस्ट हटवली आहे.

जळगाव शहराचा विस्तार जसजसा वाढत आहे तशी विकृती देखील वाढत चालली आहे. कोण केव्हा कुठे काय कृती करेल याचा काही नेम राहिला नाही. काही दिवसांपूर्वीच एका माथेफिरूने चारचाकी, दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला होता. कोणी मध्यरात्री भर चौकात फटाके फोडतो तर कुणी बुलेटच्या सायलेन्सरचा गन शॉट सारखा आवाज काढतो. जळगावातील तरुणाई व्यसनाधीन होत चालली असून नशेतच असे कृत्य घडतात. नुकतेच असाच एक प्रकार समोर आला असून दिल्ली, मुंबईत सहसा घडणारे हे प्रकार जळगावात आणि ते देखील पोलीस अधिक्षकांच्या घरा शेजारी घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हे पण वाचा : अरे बापरे.. एसपींच्या बंगल्या शेजारील भिंतीवर लिहिली आक्षेपार्ह पोस्ट

जिल्हा पोलीसदलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांचे निवासस्थान ‘अभय’ आहे. पोलीस अधिक्षकांच्या घराजवळच शहरातील सर्वात सुंदर आणि रात्रीच्या वेळी मोठी गजबज असलेला काव्य रत्नावली चौक आहे. पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानाला लागून एक मोकळी जागा असून त्याठिकाणी कांताई उद्यान प्रस्तावित आहे. रस्त्याच्या कडेला फूटपाथला लागून असलेल्या या भिंतीवर नेहमी काही ना काही उपक्रम राबविण्यात येतात किंवा काहीतरी समाजोपयोगी संदेश लिहिले जातात.

पोलीस अधिक्षकांच्या बंगल्या शेजारील ती भिंत सध्या एका वेगळ्याच संदेशमुळे जळगावकरांचे लक्ष वेधून घेत होती. काही टारगटांनी भिंतीवर थेट व्यवस्थेचा निषेध करीत व्यवस्थेला शिवीगाळ करणारी पोस्ट लिहिली होती. एकीकडे HipHop चे स्वागत तर दुसरीकडे ‘Fuck the System’ असे लिहीत टारगट तरुणांनी थेट व्यवस्थेलाच आव्हान दिले होते. जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत रविवारी सकाळीच वृत्त प्रकाशित केले होते. ‘जळगाव लाईव्ह न्यूज’च्या वृत्ताची पोलीस अधिक्षकांनी गंभीर दखल घेतली. पोलीस अधिक्षकांच्या सूचनेनंतर ‘ती’ पोस्ट हटविण्यात आली आहे.

पोलीस अधिक्षकांच्या बंगल्या शेजारी मुख्य चांगल्या चौकात अशी पोस्ट लिहिणारे तरुण कोण होते याचा शोध घेणे पोलीस विभागामार्फत सुरू आहे. जळगावातील अशी प्रवृत्ती वेळीच ठेचणे आवश्यक असून त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही केली जाईल हे निश्चित आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.