⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जिल्हा परिषद शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध – ना. गुलाबराव पाटील

जिल्हा परिषद शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध – ना. गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ ।  माझे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, जिल्हा परिषदेच्या 14 शाळा तसेच इतर खाजगी 23 शाळा अशा 37 शाळांच्या स्वच्छ विद्यालय स्पर्धेत पुरस्कार साठी पात्र ठरल्या बद्दल सदर शाळांना पुरस्कार वितरण प्रसंगी वी स्कूल अंतर्गत उत्तम लेसन तयार करणाऱ्या शिक्षकांच्या गौरव कार्यक्रमात गुलाबराव पाटील बोलत होते.

व्यासपीठावर भुसावळ चे आमदार संजय सावकारे, रावेरचे आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत ,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जमादार, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव , व्ही स्कूल कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक खलील शेख, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, वोपा टीमचे संस्थापक प्रफुल्ल शशिकांत, ऋतुजा जेवे, आदिती, राहुल,उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार ,स्वच्छता पुरस्कार समितीच्या जिल्हा समन्वयक श्रीमती सरला पाटील, सहाय्यक कल्पेश पाटील,जिल्हा स्वच्छता निवड समितीचे सदस्य सदस्य डॉ. हारून शेख, राज्यपाल पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील पितांबर पाटील, ज्ञानेश्वर आबा सोनवणे तसेच इतर समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळा ही सर्वसामान्यांची शाळा म्हणून ओळखली जाते, त्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा पूर्ण असाव्यात या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने मी, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ आणि शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी मिळून प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील पाचशेपेक्षा जास्त शाळांना वॉल कंपाऊंड ची कामे पूर्ण केली. माध्यमातून खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळांची आणि विद्यार्थ्यांची  सुरक्षितता वाढली,अनेक शाळांमध्ये बाला उपक्रमांतर्गत उत्तम कामकाज झाले, 300 पेक्षा जास्त नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम केले, 250 पेक्षा जास्त वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली. कोरोना कालावधीमध्ये ज्याने स्वच्छता राखली त्याला कोणताही त्रास झाला नाही. स्वच्छतेचे महत्व विद्यार्थीदशेतच रुजणे आवश्यक आहे, या कामी या शाळांनी मोलाचा पुढाकार घेतला आणि पुरस्कार प्राप्त केला याबद्दल त्यांनी सर्व शाळांचे आपल्या भाषणातून अभिनंदन केले.

याच कार्यक्रमात vopa या संस्थेच्या आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकाराने vस्कुल उपक्रमांमध्ये उत्तम काम करणाऱ्या चारशे शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. शिक्षकांनी आपल्या बोलीभाषेत ऑनलाईन व्हिडिओ तयार केले हे खरतर शिक्षकांचे कौतुकच आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल,

  याप्रसंगी बोलताना माननीय श्री जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत म्हणाले जिल्ह्यातील शाळा मोठ्या संख्येने पुरस्कारासाठी पात्र झाल्या, ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. शाळांनी विद्यार्थ्यांना असेच उत्तम प्रकारचे शिक्षण देऊन विविध उपक्रमांमध्ये प्रकर्षाने सहभाग नोंदवावा आणि जिल्ह्याच्या लौकिकात भर घालावी, जिल्ह्यातील शिक्षकांनी तयार केलेले व्हिडिओ संपूर्ण जगात पाहिले जातील देशामध्ये शिक्षकांचा लौकिक त्यादृष्टीने वाढेल खरं तर हे आदर्श पुरस्कारापेक्षा खूप मोठे काम आहे, अशाच प्रकारची गुणवत्तेचे चळवळ तयार व्हावी तंत्रस्नेही शिक्षकांनी या बाबतीत पुढाकार घ्यावा असे आवाहनही माननीय जिल्हाधिकारी यांनी केले. याप्रसंगी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले.जिल्हा परिषद शाळा विकासासाठी माननीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सारेजण काम करत आहोत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांना भौतिक सुविधा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सोडा कलमी कार्यक्रमाची सुरुवात माननीय पालक मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे. यात जास्तीत जास्त शाळांना बाला उपक्रमांमध्ये भौतिक सुविधा पूर्ण करण्यामध्ये एकत्रितपणे काम करावयाचे आहे. पालक संपर्क अभियानाच्या माध्यमातून पालकांचा शिक्षकांशी संवाद वाढवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी देखील प्रशासन प्रयत्न करत आहे, निपुण भारत कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या झालेला  शैक्षणिक तोटा भरून काढण्याचे काम यावर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करावयाचे आहे. याप्रसंगी माननीय आमदार श्री संजय सावकारे यांनीही मनोगत व्यक्त केले जिल्ह्यातील पात्र झालेल्या सर्व शाळांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. एवढ्या मोठ्या संख्येने गुणी शिक्षकांचा कौतुक सोहळा पाहून आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.v-school उपक्रमाच्या यशाचे खरे श्रेय शिक्षकांनाच असल्याचे माननीय जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील यांनी केले त्यात सद्यस्थितीत शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची त्यांनी माहिती दिली ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील प्राथमिक शिक्षक यांनी केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह