⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | Petrol Diesel Rate : पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याबाबत केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Petrol Diesel Rate : पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याबाबत केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । मागील काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाठ वाढले आहे. वाढत्या इंधन दरवाढीनंतर देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामान्य होरपळून निघत आहे. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज शनिवारी पेट्रोल (Petrol Rate) आणि डिझेलच्या (Diesel Rate) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग 28 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे. याबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

आज शनिवारी जाहीर झालेल्या नवीन दरानुसार जळगावात पेट्रोल ११२. १९ रु. प्रति लिटर तर डिझेल ९७.३४ रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे.दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. पेट्रोलवर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये अबकारी कर कमी करून सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशन संतप्त झाले आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 इतका आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.78 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 रुपये इतका आहे.

केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
केंद्र सरकारने सर्व रिटेल आउटलेटसाठी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्गम भागासाठीही त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही सरकारने आपल्या निर्णयात म्हटले आहे. आत्तापर्यंत ही प्रक्रिया फक्त ईशान्येत लागू होती पण तिचा विस्तार केला जाईल आणि देशाच्या इतर भागातही लागू केला जाईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.