जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढतीच आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे ६ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. आज सर्वाधिक रुग्ण भुसावळ शहरात आढळून आले आहे. त्यामुळे जळगावकरांनी आता खबरदारी घेतली पाहिजे.
गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या आढळून येत नव्हती. परंतु गेल्या काही दिवसापासून ती आढळून येत आहे. आज भुसावळ शहरात सर्वाधिक ३ रुग्ण आढळून आले आहे. आज ६ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५७५ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९६८ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १६ रुग्ण कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५९१ बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहरात-० , जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-३, अमळनेर-० , चोपडा-१ , पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण ६ बाधित रूग्ण आढळले आहे.