जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । राज्यसभा निवडणुकित भारतीय जनता पार्टीने ३ पैकी ३ जागावर विजयी मिळवले भाजपने रचलेले शर्यंत्र यशस्वी ठरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांची राज्यसभा निवडणुकीत दणदणीत विजयी झाले. भारतीय जनता पार्टीचे ३ खासदार निवडून आल्या बदल जळगाव शहरातील (बीजेपी) “वसंत स्मृती” कार्यालयात येथे फटाके फोडून पेढे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा आ. सुरेश (राजूमामा) भोळे व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेता भगत बालानी, उज्वला बेंडाळे, प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, जिल्हा पदाधिकारी सुभाष तात्या शौचे, अरविंद देशमुख, महेश चौधरी, ज्योतीताई निंबोरे, रेखाताई कुलकर्णी, बापू ठाकरे, प्रकाशजी पंडित, धिरज वर्मा, गणेश माळी, योगेश पाटील, वंदनाताई पाटील, मंडळ अध्यक्ष संजय लुल्ला, आघाडी पदाधिकारी दिप्तीताई चिरमाड़े, रेखाताई वर्मा, सरोज पाठक, ज्योती राजपूत, शोभा कुलकर्णी, छाया सारस्वत, ज्योती बर्गे, युवा मोर्चा पदाधिकारी भूषण भोळे, मिलिंद चौधरी, दिशांत दोशी, जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरिकर, सागर पाटील आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.