जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । भुसावळ शहरातील विठ्ठल मंदीर वाॅर्डातील महाराष्ट्र बॅकेजवळ राहात असलेले प्रकाश यादव बऱ्हाटे ही मुलीच्या लग्नासाठी पुण्याला गेले होते. त्याचवेळी चाेरट्यांनी संधी साधून त्यांच्या बंद घरातून चांदीची भाडे, पाच हजार रूपये राेख व होम थिएटर असा सुमारे २० हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल लांबवला.
बऱ्हाटे हे १४ मे रोजी पुण्याला गेले हाेते. त्यामुळे चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूने आत प्रवेश केला. वरच्या मजल्यावरून शिडी लावून चाेरटे खाली उतरले. चाेरट्यांनी बऱ्हाटे यांच्या घरातील साहित्याची फेकाफेक केली. देवघरातील चांदीचे ताट, तांब्या, पाच हजार रूपयांची चिल्लर, सीसीटिव्ही कॅमेरे, हाेम थिएटर असा एेवज चाेरून नेला. बऱ्हाटे हे मंगळवारी पुण्यातून घरी अाल्यावर त्यांनी चोरीची घटना समजली. त्यांनी बाजारपेठ पाेलिस ठाणे गाठून पाेलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांना घटनेची माहिती दिली. चाेरीचा गुन्हा दाखल झाला आहे.