राजा शिवछत्रपती परिवारातर्फे मोफत ‘नीट’ कार्यशाळेचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) या राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. त्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना योग्य ती माहिती मिळावी, यासाठी रविवार दि. १२ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजे दरम्यान, नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे छत्रपती मराठा साम्राज्य व राजा शिवछत्रपती परिवारा तर्फे मोफत एकदिवसीय NEET कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, हा कार्यक्रम सर्वांसाठी निःशुल्कपणें खुला असल्यामुळे, 10वी 12वी च्या जास्तीतजास्त विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहून ह्या सुवर्णसंधीचा उपभोग घ्यावा असे आवाहन संघटनेचे कार्यकर्ते जितेंद्र पवार, दिपक चव्हाण, सूर्यकांत पाटील आणि उदयराम पाटील यांनी केले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील विविध पदवी जसे की MBBS, BDS, BAMS, BUMS, BHMS पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET)(राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा) देणे अनिवार्य आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्व माहिती हाताच्या बोटावर उपलब्ध असताना देखील विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि विद्यार्थ्यांची तारांबळ उडून, मनात संशयकल्लोळ निर्माण होतो. हीच बाब लक्षात घेता विद्यार्थ्याचे आयुष्य घडविणाऱ्या या निर्णयात घोडचूक नव्हता योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर वेळी NEET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नावाजलेल्या लातूर-नांदेड पॅटर्न चे सुप्रसिद्ध शिक्षक व बोटनी गोल्ड मेडलिस्ट जितेंद्र चव्हाण (MSc Botany Gold Medallist, SET/NET-JRF Qualified, Gate Qualified, TIFR Qualified) यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या कार्यशाळेत 10वी 12वी च्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठी पात्रता, नीट परीक्षा अभ्यासक्रम, नीट परीक्षेसाठीची पुस्तके, नीटचा अभ्यास कसा करावा, नीट इन्स्टिट्यूट, नीट नंतरच्या करियर संधी, अशा विविध विषयांवर माहिती मिळणार असून विद्यार्थ्याना त्यांच्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्याची संधी देखील प्राप्त होणार आहे.