⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

भाजपने मला अडगळीत टाकले आणि पवारांनी मला बाहेर काढले : खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । माझी संपूर्ण हयात भाजपच्या वाढीसाठी गेली. त्यासाठी मी अपार मेहनत घेतली मात्र भाजपने माझ्यावर अन्याय केला मला अडगळीत टाकले. आता शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहेत मला अडगळीतून बाहेर काढले आहे. माझ्या अडचणीच्या काळात मला साथ दिली आहे. त्याच्या विश्वासानुसार राष्ट्रवादी पक्ष विस्तारासाठी काम करणार अशी ग्वाही एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसे बोलत होते.

विधान परिषदेची निवडणूक २० जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपाने त्यांचे उमेदवार बुधवारी जाहीर केले आहेत. तर आज सकाळी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानपरिषदेसाठी उमेदवारांची घोषणा केली. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली. यावर एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेत, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. विधान परिषदेसाठी माझे नाव राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जाहीर केल्याबद्द्ल मी त्यांचे आभार मानतो असे खडसे म्हणाले.

हे देखील वाचा : Big Breaking : विधान परिषदेसाठी एकनाथराव खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर

गेली चाळीस वर्षे मी निष्ठेने काम करीत होतो. अनेक वेळा माझ्यावर अन्याय होत होता. अनेक प्रसंग असे होते कि भाजपने मला वारंवार गाजर दाखविले म्हणून मला राष्ट्रवादीत यावे लागले. मी अख्खे आयुष्य भाजप उभी करण्यात घालविले. शरद पवार यांनी विश्वास दाखवून मला संधी दिली. अडचणीच्या वेळातच साथ देणे, हात देणे आवश्यक असते.यामुळे पवारांचे आणि राष्ट्रवादीचे रुण मी कधीच विसरणार नाही. असे यावेळी खडसे म्हणाले.