जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । भुसावळ येथून अनोळखी भामट्याने चक्क ऑटो रिक्षा लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बहजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
भुसावळ शहरातील जामनेर रोड, अष्टभुजा देवी मंदिरामागे, दत्त मंदिराजवळील रहिवासी राजेश पितांबर पाटील (वय ४९) यांच्या मालकीची, ७० हजार रुपये किमतीची ( क्रं. एमएच १९ बीयू ४१६२) ऑटो रिक्षा दि. ७ रोजी १२.१० ते १२.२० दरम्यान अनोळखी भामट्याने चोरून नेली. या प्रकरणी पाटील यांनी दि. ८ रोजी बाजारपेठ पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी भामट्या विरुद्ध भा, कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहे कॉ. रवींद्र सपकाळे करीत आहे.