४५ वर्षीय विवाहित महिलेचा मद्यपीने केला विनयभंग
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । यावल तालुक्यातील नागादेवी या आदिवासी पाड्यावरील विवाहित महिलेला घरात एकटी पाहून मध्यरात्री एकाने तिच्या घरात प्रवेश करून अतिप्रसंगाचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला. ही घटना सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागादेवी येथे घडली. दारूच्या नशेत सदर कृत्य करणाऱ्याने महिलेस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपी पसार झाला. या प्रकरणी येथील पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागादेवी या आदिवासी पाड्यावरील ४५ वर्षीय विवाहितेने पोलिसांत फिर्याद दिली. त्या नुसार तिचे पती लग्नाला गेल्याने ती रात्री घरी एकटी होती. तिला घरात एकटी पाहून रात्री ११ वाजेच्या सुमारास याच पाड्यावरील गुड्या भायला मानकर हा तिच्या घरात आला व तिला विचारले की, तुझे पती कुठे गेले आहेत? विवाहितेने पती लग्नाला गेल्याचे सांगितले. ते ऐकून दारूच्या नशेत असलेल्या गुड्याने विवाहितेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. तेव्हा विवाहितेने आरडाओरड केली. त्याने तिचे तोंड दाबले व तिचा विनयभंग केला. सदर प्रकार कुणास सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत तेथून ताे पसार झाला.
विवाहितेने घडलेला सारा प्रकार त्याच्या पतीला सांगितला. त्यांनी तेथील पोलिस ठाण्यात जाऊन गुड्ड्या मानकर याच्याविरुद्ध विवाहितेचा विनयभंग करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी दिलेल्या फिर्याद नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करत आहेत