⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver Rate : आजचा सोने-चांदीचा दर जाहीर ; तपासा आजचा प्रति तोळ्याचा दर

Gold Silver Rate : आजचा सोने-चांदीचा दर जाहीर ; तपासा आजचा प्रति तोळ्याचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । सोनं खरेदीदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सोनं कधी स्वस्त होतं याकडे अनेकांची नजर असते. दरम्यान, मागील दोन दिवस घसरण झाल्यानंतर आज बुधवारी सोन्याच्या (Gold Rate)भावात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या (Silver Rate) दरात मात्र किंचित घसरण झाली आहे. जळगाव सराफ बाजारात आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात १०० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल सोन्याच्या भावात १०० घसरण झाली होती. तर आज चांदी ६० रुपयाने स्वस्त झाली आहे. यापूर्वी काल चांदीच्या दरात ६५० रुपयाची वाढ झाली होती.

आज जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५२,१६० रुपयावर पोहोचला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६३,७०० रुपयावर आला आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर केले जातात. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत पहायला मिळते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

मागील गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होत आहे. गेल्या आठवड्यात सोने दोन वेळा महाग तर दोन वेळा स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे चांदी ३ वेळा महाग तर दोन वेळा स्वस्त झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने ३०० ते ३५० रुपयांनी महागले आहे. चांदी देखील ३०० ते ३५० रुपयांपर्यंत महागली आहे.

या वर्षी मार्चमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ होउन ते ५५ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रामपर्यंत पोहचले होते. तर चांदी तब्बल ७३ हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली होती. मात्र तीन महिन्यात सोन्याचे दर जवळपास ३२०० ते ३४०० हजाराहून अधिकने घसरले आहे. तर चांदीचा सध्याचा दर देखील त्याच्या उच्चांकापेक्षा सुमारे ९ हजार रुपयांहून अधिकने घसरली आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
३० मे २०२२- रुपये ५२,११० प्रति १० ग्रॅम
३१ मे २०२२ – रुपये ५२,११० प्रति १० ग्रॅम
१ जून २०२२ – रु ५२,०५० प्रति १० ग्रॅम
२ जून २०२२ – रु ५१,९८० प्रति १० ग्रॅम
३ जून २०२२ – रु ५२,४७० प्रति १० ग्रॅम

गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
३० मे २०२२- रुपये ६३,५७० प्रति किलो
३१ मे २०२२ – रुपये ६३,३३० प्रति किलो
१ जून मे २०२२- रुपये ६२,५६० प्रति किलो
२ जून मे २०२२- रुपये ६३,०२० प्रति किलो
३ जून मे २०२२- रुपये ६३,८०० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.