⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | बातम्या | आयुक्तांची जादू कायम : जप्त केलेले पस्टिक विकून मनपाचे ११ लाखाचे उत्पन्न वाढवले

आयुक्तांची जादू कायम : जप्त केलेले पस्टिक विकून मनपाचे ११ लाखाचे उत्पन्न वाढवले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | ५ जून २०२२ | पर्यावरण दिनाच्या पूर्व संध्येला आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी प्लॅस्टिक विक्रीवर मोठी कारवाई केली होती. यावेळी एमआयडीसीतील डी सेक्टरमधील आणखी एक कारखाना सील केली. या आधी एमआयडीसी भागातील कारखान्यावर छापा टाकून त्यांनी ५५ हजारांचा दंड वसूल केला होता. यावेळी मिळालेल्या किंबहुना जप्त केलेल्या पस्टिकची मनपाने विक्री केली. आणि त्यातून तब्बल ११ लाखाचे उत्पन्न मनपाने वाढवले.

एमआयडीसीमधील ‘डी ५५’ येथे येथील श्री अनिल मदनदास गेरडा यांचे मालकीच्या स्टीक पिशव्या प्लास्टीक ग्लास प्लेटच्या गोडाउनची तपासणी करण्यात आली होती. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या गोडाऊनची आरोग्य व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास तपासणी केली होती.

या तपासणीत फार मोठ्या प्रमाणात प्रतिबंध असलेल्या प्लास्टीक पिशव्या, प्लास्टीक ग्लास आणि प्लेट या साहित्यांचा साठा आढळून आला. यात ३० ते ३५ टन माल जप्त करण्याची कारवाई करत गोडावून सिल करण्यात आले होते.

ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर, साजिद अली, किशोर सोनवणे, नाना कोळी, नितीन भालेराव, आरोग्य निरीक्षक जितेंद्र किरंगे, रमेश कांबळे, यु. प्र अर्जुन पवार, मुकादम विक्की डोंगरे व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी केली होती.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह