जळगाव लाईव्ह न्यूज । CORONA ALEART। जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असे जरी म्हटले जात असले तरी जिल्हा प्रशासन कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. अशी माहिती जळगाव लाईव्ह शी बोलताना जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ किरण पाटील यांनी दिली.
यावेळी किरण पाटील म्हणाले की, संपूर्ण राज्यासह देशांमध्ये कोरोनाची लाट येण्याची भीती आहे सरकारने याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आता मास्क घालण्याची सवय पुन्हा करून घेणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आता नागरिकांना आव्हान करणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील लसीकरण देखील आता मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची गरज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील यांनी ‘जळगाव लाईव्ह’ शी बोलताना सांगितले.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या दोन मोठ्या लाटा येऊन गेल्याने जळगाव जिल्ह्याच्या प्रशासनासाठी कोरोना आता काही नवीन बाब राहिलेली नाही. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाने आदेश करून ठेवले आहेत. बेडची आवश्यकता यावेळी लागणार नाही असा अंदाज आहे मात्र तरी सुद्धा जर बेडची आवश्यकता भासलीच तर त्यासाठी कोरोनाच्या पेशंट साठी विशेष बेडची आम्ही तरतूद केली असल्याची माहिती यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील यांनी दिली.