जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । दरोड्याच्या प्रयत्नात असलेली गॅंगला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली, त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तुलसह १७ काडतूस असे एकूण ७ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
रवींद्र वसंत खोर्गे (वय २४), जिजाबा फाळके ( वय ३९), चांदपाशा शेख ( वय ३२), जयेश भुरूक (वय २४ ) असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपीचे नाव आहे. तर सतनामसिंग जुनैजा हा पाचवा आरोपी पसार झाला आहे. दि. ४ रोजी चोपडा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील लासुर ते सत्रासने रोडवरील उत्तमनगर गावाच्या अलीकडे असलेल्या घाटात सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास धाक दाखवून दहशत माजवून दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असताना सदर आरोपी आढळून आले. त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तुलसह १७ काडतूस हस्तगत करण्यात आले. पसार आरोपी सतनामसिंग जुनैजा यास पकडण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीच्या छातीवर वार करून ” तेरे मे धम हैं मुझे पकड के दिखा” असे बोलून शासकीय कामत अडथळा निर्माण केला. पसार आरोपीने अटकेतील आरोपींना दरोडा टाकण्याच्या उद्देशाने प्राणघातक श्स्र्तरे विक्री केली. व दरोडा टाकण्यासाठी मदत केल्या प्रकरणी पोह्स्को मनोज अशोक दुसाने यांनी दिलेल्या दीर्यादींनुसार चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहेत.