⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | दैव बलवत्तर होते म्हणून.. परधाडे स्थानकाजवळ कामाख्या एक्सप्रेसला लागला जेसीबीचा कट

दैव बलवत्तर होते म्हणून.. परधाडे स्थानकाजवळ कामाख्या एक्सप्रेसला लागला जेसीबीचा कट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२२ । पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकानजीक काळजाचा ठोका चुकविणारा एक अपघात घडलाय. भरधाव वेगाने जाणाऱ्या कामाख्या एक्सप्रेसला जेसीबीचा कट लागल्याची घटना आज परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेने मोठी प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.

काय आहे नेमकी घटना?
आज शनिवारी सकाळी जळगाव ते पाचोरा दरम्यानच्या परधाडे रेल्वे स्थानकानजीक कामाख्याहुन लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेस (क्रं. १२५२० अप) ला जेसीबीचा चा पुढील भाग लागला. रेल्वे रुळा खाली बसविण्यात येणारे सिमेंटचे ब्लॉक जेसीबीच्या सहाय्याने ठेवण्याचे काम असताना हा अपघात घडलाय. यावेळी जेबीसीचा पुढील भाग कामाख्या एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या निदर्शनास येताच लोकोपायलट ने जोरात हॉर्न वाजवुन सूचना दिला. मात्र याकडे जेसीबी चालकाने दुर्लक्ष केले. यामुळे भरधाव वेगाने येणार्‍या कामाख्या एक्स्प्रेसच्या इंजिनच्या डाव्या बाजुच्या चाकाजवळ जेसीबीचा पुढील भाग धडकला. यावेळी मोठा आवाज झाल्याने काहीवेळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान एक्स्प्रेसने जेसीबीला काही अंतरावर फरफटत नेले.

लोकोपायटलने गाडी कंट्रोल करत थांबवली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी पुढील होणारा अनर्थ मात्र निश्चित टळला. कामाख्या एक्स्प्रेसला घटनास्थळी सुमारे एक तास खोळंबा झाल्यानंतर जेसीबी बाजुला हटविल्यानंतर धीम्या गतीने पाचोरा रेल्वे स्थानकावर दुपारी १२ वाजुन ५३ मिनिटांनी प्लॅट फार्म क्रमांक १ वरील लुप लाईनलावर थांबविण्यात येवुन भुसावळ येथुन दुसर्‍या इंजिनला पाचारण करण्यात आले. भुसावळहुन इंजिन आल्यानंतर क्षतीग्रस्त झालेले इंजिन बाजुला करुन कामाख्या एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने रवाना करण्यात आली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.