जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । चहाच्या टपरीतून १ लाख ७५ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. ही घटना शहरातील महात्मा गांधी मार्केट जवळ घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भिका लिंगा गवळी (वय ३८) रा. दालफळ गवळी, शनिपेठ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून ते चहाची टपरी चालवून आपला आदरनिर्वाह करतात. त्यांचे महात्मा गांधी मार्केट समोर चहाची टपरी आहे. बुधवार दि. १ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ते त्यांच्या चहाच्या टपरीजवळ उभे असताना चार अनोळखी व्यक्ती आले. त्यापैकी एकाने चहाच्या टपरीत ठेवलेली बॅगेतून १ लाख ७५ हजाराची रोकड लांबविली.
दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यावर भिका गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी गुरूवार दि. २ जून रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.