⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | हवामान | Monsoon Update : यंदाचा पावसाळा दमदार, जळगावसह १४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

Monsoon Update : यंदाचा पावसाळा दमदार, जळगावसह १४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । यंदा तीन दिवस आधीच मान्सून (Monsoon) केरळमध्ये (Keral) दाखल झाला आहे. मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर हवामान विभागाकडून (Meteorological Department) पावसाचा दुसरा अंदाज जाहीर करण्यात आला. दरम्यान, देशात जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या तुलनेत 103 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील (Maharashtra) जळगावसह (Jalgaon) १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

पावसाचा हा अंदाज हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिल्लीत झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत जाहीर केला. हवामानशास्त्र विभागाने याआधी 14 एप्रिलला पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत 99 टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता पावसाच्या प्रमाणाचा अंदाज वाढविण्यात आला असून, तो 103 टक्के करण्यात आला आहे. अर्थात, त्यामध्ये चार टक्के कमी-अधिक होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.

दरम्यान, यंदा राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक,औरंगाबाद, लातूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

आयएमडीनुसार, नैऋत्य मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापलं असून कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काहीं भागात आणि दक्षिण-पश्चिमच्या अनेक भागात मान्सून पुढे सरकला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून कोकण आणि गोव्यामध्ये पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळीवारा, मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काल उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात वादळीवाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात २ ते ५ जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.