पोलिसांची ड्युटी आठ तासांची करणेसाठी पोलीस मित्र संघटनेचे निवेदन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । जामनेर तालुका पोलिस मित्र संघटनेच्यावतीने तहसीलदार अरूण शेवाळे व पोलिस निरीक्षक किरणं शिंदे यांना पोलिस बांधवांची आठ तास ड्युटी करणेबाबत निवेदन आज देण्यात पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाच्या विचार करण्याची गरज आहे. पोलिसांनाही योग्य विश्रांतीची गरज आहे. चोवीस चोवीस तास सतत ड्युटी केल्यामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडले जात आहे. तरी शासनाने पोलिसांची ड्युटी आठ तासाची करण्याचा निर्णय घेण्याची मागणी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेच्या माध्यमातून पत्रकाद्वारे केली आहे. महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी व पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचारी वर्ग अतिशय कर्तव्यदक्ष प्रामाणिक पणे जिवाची पर्वा न कर्ता कर्तव्य बजावत असतात. आपल्या कुटुंबासोबत कुठल्याही परिस्थितीत कोणताही सण आणि इतर सुखाचा वेळ देऊ शकत नाहीत. पोलिसांना २४ तास सतत जनसेवेसाठी सज्ज रहावे लागते. पोलीस दलातील अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत कर्तव्यनिष्ठ असतात.
आम्ही सामाजिक कार्यकर्ते असल्याने अनेक वेळा पोलिस बांधवांशी आमचा संपर्क आला आहे. आमच्या मनामध्ये पोलिस बांधवांनबाबत आदर आहे. पोलिसांनी जनतेला रात्रंदिवस तत्पर सेवा मिळावी म्हणून अनेक पथकेही स्थापन केली आहेत. उदा महिलांसाठी दामिनी पथक, जेष्ठ नागरीकांसाठी, लहान मुलांसाठी, वाहतुकीसाठी सतर्क अशा विविध अनेक जनतेच्या सेवेसाठी सुविधा उपलब्ध केले आहेत. पोलीस बांधव चोवीस तास इतके प्रामाणिक पणे काम करीत असताना सुद्धा समाजातील काही लोक पोलिसांकडे अतिशय संशयी नजरेने पाहत असतात. समाजातील अशा लोकांनी पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. अति ताणामुळे पोलिसांचे मानसिक आरोग्य बिघडत असते. अशा परिस्थितीत त्यांना कुटुंबियांना जास्त वेळ देता येत नाही त्यामुळे पोलिसांची ड्युटी आठ तासाची असावी म्हणजे ते आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देतील… आज पोलिसांमुळे जनता सुरक्षित आणि सुखरूप आहे पण पोलिसच असुरक्षित आहे. त्यामुळे पोलिसांची ड्युटी आठ तासाची असावी अशी मागणी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांनी पोलीस निरीक्षक श्री किरण शिंदे जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदनाद्वारे केली आहे निवेदन सादर करते वेळी जामनेर तालुका विधानसभा अध्यक्ष ईश्वर चोरडिया, जळगाव जिल्हा संघटन प्रमुख किशोर खोडपे, जळगाव जिल्हा युवा सह संघटक सुमित मूनोत, जळगांव जिल्हा उपसचिव रितेश डांगी, जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष दशरथ पाटील, जामनेर तालुका युवक अध्यक्ष भुषण कानडजे, जामनेर तालुका सह निरीक्षक अशरफ कंजर, जामनेर तालुका सह सचिव राहुल रॉय मुळे,जामनेर तालुका सदस्य प्रल्हाद पाटील, कल्पेश कोठारी,विकास इंगळे,विशाल सोनवणे, राहुल पाटील,विशाल पाटील, विवेक कुमावत,मनोज खोडपे, हे उपस्थित होते.