जळगाव जिल्हा
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे रविवारी रोजी कविरा ग्रूपच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न झाले. यात कविरा ग्रुपच्या सदस्यांसह अन्य नागरिकांनी रक्तदान केले. दरम्यान, महाराष्ट्रात रक्ताची कमतरता असून ही भरपाई करणे आपली सगळ्यांची जबाबदारी असल्याचे मत ग्रुपच्या वतीने करण्यात आले.
तसेच जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातही रक्तांची कमतरता बासू लागली आहे. त्यामुळे ही भरपाई करण्यासाठी सगळ्यांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी कवीरा ग्रुपचे अध्यक्ष शिवाजी महारु हटकर, महेश कोळी, मनोज पाटील, संभाजी हटकर राहुल हटकर, भूषण हटकर, हरी हटकर, वासुदेव हटकर उपस्थित होते.