प्रवाशांनो लक्ष द्या : मनमाड-मुंबई, जनशताब्दी गाड्या रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी जवळील टिटाेली यार्डात २३ ते ३१ मे असे ९ दिवसांपर्यंत इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकिंग कामासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेस व मनमाड-मुंबई या दाेन गाड्या रद्द, तर काही गाड्या इगतपुरी रेल्वे स्थानकावर चार तासांपेक्षाही जास्त वेळ उभ्या केल्या जाणार आहेत.
०२१०२ व ०२१०१ मनमाड-मुंबई-मनमाड ही गाडी २८ मे ते २ जूनपर्यंत रद्द असेल. तर २८ मे या दिवशी डाऊन गाड्यांचे रेग्युलेशन केले आहे. यामुळे ११०५९ एलटीटी-छपरा, ११०६१ एसटीटी-जयनगर आणि अप मार्गावरील १२०७२ जालना-मुंबई जनशताब्दी, १२१४२ पाटलीपुत्र-एलटीटी, गोरखपूर-पनवेल गाड्या विलंबाने धावतील.
मंगळवारी ३१ मे रोजी टिटोली यार्डात सकाळी ५.१५ ते ११.१५ वाजेपर्यंत ब्लॉक आहे. या पार्श्वभूमीवर २८ मे रोजी १२१४१ एलटीटी-पाटलीपुत्र २९ मे रोजी सकाळी ४.३० वाजता, २८ मे रोजीचा पनवेल-गोरखपूर सायंकाळी ६.३० वाजता, तर १२०७१ मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस व १२०७२ जालना-मुंबई जनशताब्दी रद्द असेल.डाऊन कामाख्या-एलटीटी ३१ रोजी विलंबाने धावेल.
ब्लाॅकच्या काळात ३१ मे रोजी इगतपुरी स्थानकावर ९० ते २७० मिनिटांपर्यंत (दीड तास ते साडेचार तास) गाड्यांना थांबा मिळेल. परिणामी या गाड्या नियोजित स्थानकांवर उशिराने पोहोचतील. त्यात ३० मे या दिवशी पाटलीपूत्र-एलटीटी, गाेरखपूर-पनवेल, छपरा-एलटीटी, गोरखपूर-एलटीटी, तर २९ मे रोजी गुवाहाटी-एलटीटी एक्स्प्रेला थांबा मिळेल.
एलटीटीहून सकाळी १०.५५ वाजता सुटणारी ११०५९ छपरा दुपारी १२.१५ वाजता, सीएसटी येथून सकाळी ११.०५ला सुटणारी ८२३५६ मुंबई-पाटणा एक्स्प्रेस दुपारी एकला सुटेल. एलटीटी येथून ११.३० वाजता सुटणारी जयनगर एक्स्प्रेस १२.३० वाजता, पनवेल येथून दुपारी ३.५०ला सुटणारी गोरखपूर एक्स्प्रेस रात्री ८.३०, एलटीटी येथून रात्री ११.३५ वाजता सुटणारा पाटलीपुत्र १ जूनला पहाटे ४.३० वाजता सुटेल.