⁠ 
शनिवार, जून 22, 2024

जळगावातील तरुणाच्या खून प्रकरणात आणखी दोन जणांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२४ । जळगाव शहरातील कालंका माता मंदिर परिसरातील एका हॉटेलमध्ये जुन्या वादातून किशोर अशोक सोनवणे यांचा बुधवारी रात्री खून झाला होता. या प्रकरणी गुरुवारी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी शनिपेठ पोलिसांनी अजून दोन संशयितांना अटक केली.

मुख्य संशयित आरोपी रुपेश सोनार याला अमळनेर येथून तर दुर्लभ कोळीला भुसावळ येथून अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणी शनिपेठ पोलिस स्टेशनमध्ये किशोरचे वडील अशोक श्रावण सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यापैकी गुरुवारी प्रशांत काकडे, रूपेश काकडे (वय २७), ईश्वर काकडे (वय २३), मयूर कोळी या चार संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने २७ पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, शुक्रवारी अजून दोन संशयितांना अटक करण्यात आली