श्री संत भीमा भोई जयंती महापौरांच्या हस्ते साजरी
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । शिरोमणी भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत भीमा भोई यांच्या १७२ व्या जयंतीनिमित्त शहरातील खंडेराव नगर परिसरातील भोई वाडा येथे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
शहरातील खंडेराव नगर येथील भोईवाडा मित्र मंडळातर्फे श्री संत भीमा भोई यांच्या जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याअनुषंगाने जळगाव शहराच्या महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांनी मनोगत व्यक्त करीत सर्व समाजबांधवांना शुभेच्छाही दिल्या. याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबीरात उपस्थित नागरिक व समाज बांधवांनी रक्तदान केले.
यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, भोई समाजाचे अध्यक्ष यशवंत भोई, समाजसेवक किरण भोई,सुनील भोई, अशोक भोई, सीताराम भोई, अनिल भोई, राकेश भोई, विकास भोई,गौरव भोई, विक्की भोई, अरविंद भोई, गोलू भोई, सचिन भोई,नाना भोई, शिवदास भोई, महारु भोई यावेळी उपस्थित खंडेराव नगरातील समाज बांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.