⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

खुशखबर ! अंड्यांचे भाव झाले कमी ; नागरिकांना दिलासा

जळगाव लाईव्ह न्युज | २५ मे २०२२ । राज्यातील कुक्कुटपालन व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीत येत चालला आहे. असला तरी याचा थेट फायदा हा सर्वसामान्य जनतेला होत आहे. कारण शेकडयामागे अंडयाचे दार ६० रुपयांनी केली झाले आहेत. गेल्या महिन्यात अंड्यांचे दार हे ५३० रुपये शेकडा इथं पर्यंत पोहोचले होते मात्र आटा तेच ४२० ते ४५० रुपये शेकड्यापर्यंत आले आहेत.

आधीच वाढत्या महागाईमुळे पशूखाद्य महागले असतांना आता महिन्याभरात सलग दुसर्‍या वेळी अंड्याच्या दरात घसरण झाली आहे. ठोक बाजारात तर प्रति शेकडा ५० रुपयांची घसरण झाली आहे.गेल्या महिन्यात अंड्याच्या किंमती सलग दोन वेळा कमी झाल्या आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही दरात घसरण झाली आहे. दिल्लीतील एनसीआर घाऊक बाजारात किंमतीतील सर्वात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश, तेलंगणा, यूपी, बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही अंड्यांच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यातही अंड्यांचे भाव कमी झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत अंड्यांच्या किंमतीत शेकडामागे सरासरी ५० रुपयांची घट झाली आहे.अंड्याच्या दरात घट झाल्याने वर्षभर झालेला खर्च काढणेही मुश्किल झाले आहे. सध्या एका अंड्याची किंमत ही ४.२५ ते ४.५० एवढी आहे.