⁠ 
सोमवार, मे 27, 2024

जळगाव शहरवासियांनो लक्ष द्या ! उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे या रस्ता राहणार बंद, पर्यायी मार्ग असा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारार्थ शहरातील शिवतीर्थ मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. यामुळे शिवतीर्थ मैदान व कोर्ट चौक परिसर दुपारी ४ वाजेपासून चार तास ठप्प होईल. अत्यावश्यक काम असेल तर नागरिकांना कोर्ट चौक वगळता अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

उद्धव ठाकरे यांची मंगळवारी सायंकाळी ६ वाजता शिवतीर्थ मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर उपस्थित राहतील. सभेला जिल्हाभरातून ४० हजार समर्थकांची उपस्थिती राहील असा दावा केला जातो आहे.

पर्यायी मार्ग : चित्रा चौकाकडून येणारी वाहतूक पद्मालय विश्रामगृहमार्गे वळवली जाईल. माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणेंच्या घराजवळ रस्ता बंद केला जाईल. क्रीडा संकुलाकडून येणारी वाहतूक रिंगरोडकडे वळवणार आहे. वाहनधारकांसाठी आर. आर. विद्यालयाकडील मार्ग, शाहूनगरातील मार्गाचा पर्याय उपलब्ध आहे. गोविंदा रिक्षा थांब्याकडून टॉवरकडे जाता येईल असे नियोजन आहे.

बंदोबस्त : सभेच्या निमित्ताने २०० पोलिसांचा बंदोबस्त असेल. त्यात सात पोलिस निरीक्षक, २२ एपीआय व पीएसआय, १७१ पोलिस कर्मचारी, एक आरसीपी प्लाटूनचा समावेश असेल

पार्किंग: सभेसाठी खान्देश सेंट्रल मॉल येथे एकाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून दुपारी चार वाजेपासून कार्यकर्ते यायला सुरुवात होणार आहे.