भुसावळ
प्राणघातक हल्ला प्रकरण : दोघांना जामीन
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । भुसावळ शहरातील समता नगरात माजी नगरसेवक रवींद्र खरात यांच्यावर हल्ला होताना आशिष आलोटकर परिवाराने मदत केली नाही. या रागातून २१ एप्रिल २०२२ रोजी आतीष खरासह पप्प्या साळवे, आकाश खिल्लारे यांनी मारहाण करून आलोटकर कुटुंबातील सदस्यांना ओलिस ठेवले होते.
या प्रकरणी अटकेतील आकाश खिल्लारे व सुमित घनघाव यांना येथील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एम.जाधव यांनी जामीन मंजूर केला. संशयीतातर्फे अॅड.सत्यनारायण पाल यांनी काम पाहिले.