⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

Petrol Diesel Rate : आजचा पेट्रोल-डिझेलचा दर जारी, जाणून घ्या प्रति लिटरचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोलवर २.०८ रुपये आणि डिझेलवर १.४४ रुपये प्रति लिटर व्हॅट कमी केल्याचा दावा महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर रविवारी केला होता. परंतु केंद्राने कमी केलेल्या दरातच पेट्रोल डिझेलची विक्री केली जात आहे. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कोणत्याही जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू झालेले नाहीत. त्यामुळे राज्यातील जनतेला दिलासा नाहीच आहे.

आज कंपन्यांकडून जाहीर झालेल्या दरानुसार जळगावात पेट्रोल ११२. १९ रु. प्रति लिटर तर डिझेल ९७.३४ रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे. तर राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 108.87 रुपये आहे तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 110.95 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.51 रुपये इतका आहे.

दरम्यान केंद्रापाठोपाठ अनेक राज्यांनी देखील पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) व्हॅटमध्ये कपात केल्याने पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त झाल्याचे पहायला मिळाले. राज्यातील ठाकरे सरकारने दर कमी केल्याचे दाखवले. यासंदर्भात प्रसारमाध्यमात देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारने दर कपातीचा कोणताच निर्णय घेतल्याचे दिसून येतेय. आता राज्य सरकार इंधन दर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा देणार का? हे पाहणे गरजेचे आहे.