जळगाव लाईव्ह न्युज | २३ मे २०२२ | शिवसेना शिवसंपर्क अभियानाअंतर्गत सर्व तालुका प्रमुखांसकट विविध पदाधिकाऱ्यांची बैठक आज घेण्यात आली होती. यावेळी अधिकाऱ्यांशी बोलताना संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणाले की गिरीश महाजन यांना संपूर्ण जिल्ह्यात फिरू न देता किंबहुना पक्षाचे काम करण्यासाठी कुठेही फीरू न देता त्यांना त्यांच्या मतदारसंघात अडकवून ठेवणे आपली जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला जामनेरमध्ये आपला गड मजबूत करावा लागेल.
पुढें सावंत म्हणाले की, तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात असे कित्येक पदाधिकारी आहेत जे चांगलं काम न करता देखील आपल्या पदावर चिटकून आहेत. अशामुळे पक्ष फुटत आहे. पक्ष वाढविण्यासाठी आपण झटले पाहिजे मात्र आपण पक्षाशी गद्दारी करत आहात. यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे.
शिवसेनेच्या शिव संपर्क अभियाना अंतर्गत 26 ते 29 मे दरम्यान संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे नेते मंडळी येणार आहेत. यावेळी हे नेते मंडळी संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढवण्याचे काम करणार आहे याच बरोबर शिवसेनेने कशा प्रकारे प्रगती किंवा अधोगती केली आहे याबाबतची माहिती ते घेणार असून वरिष्ठांना कळवणार आहेत. या अनुषंगाने अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे विशेष बैठकीचे आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आले होते. यावेळी संजय सावंत बोलत होते.
गेल्या तीन वर्षांमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, महा विकास आघाडी यांनी उत्तम काम केले आहे. हे काम लोकांपर्यंत पोहोचवणे आपली जिम्मेदारी आहे. यामुळे आता पक्षाचं काम वाढवा. पक्षाचं काम संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवा. कारण की समोरचा पक्ष व्यवस्थित प्लॅनिंग करून स्वतःचा पक्ष विस्तार करत आहे. भारतीय जनता पक्षाचा म्हणायला झालो तर, त्यांच्या तीन टीम आहेत. एक टीम समोरच्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करते. एक टीम समोरच्यांना माणसं फोडायचं काम करते आणि एक टीम पक्षाचं काम करते. मात्र आपल्या तसं काही दिसत नाही. आता आपल्याला एकत्र येऊन सर्वांचा सामना करायचा आहे. त्यासाठी पक्षाशी गद्दारी करून चालणार नाही. असेही यावेळी संजय सावंत म्हणाले.